व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारांचे गुणवंत पाल्य व जेष्ठ पत्रकारांचा गौरव

कळंब (प्रतिनिधी -): लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेला ग्रामीण स्तरावर हक्काचे व्यासपीठ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य व्हाईस ऑफ मीडिया संघटनेने केले असून, यामुळे पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न निर्भीडपणे मांडू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय दुधगावकर यांनी केले.
कळंब येथील पंचायत समितीच्या सभागृहात व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा व जेष्ठ पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एकूण ३० गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. माजी अध्यक्ष संजय पाटील दुधगावकर होते. उद्घाटक म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार भराडिया उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रश्मी मारवाडी (महिला विंग प्रदेशाध्यक्षा), उमेश पोतदार (कृषी विभाग), चेतनजी कात्रे (शैक्षणिक विंग), अमर चोंदे (कार्यवाहक, महाराष्ट्र राज्य) आणि अशोक शिंदे (अध्यक्ष, पत्रकार संघ कळंब) आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सौ. संगीता वनकळस यांची महिला विंग जिल्हाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोशी महाराज मोहेकर यांनी तर आभारप्रदर्शन पत्रकार सुधाकर रणदिवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रामरतन कांबळे, सतिश तवले, शिवप्रसाद बियाणी, संजय कवडे, सुधाकर रणदिवे यांचे विशेष सहकार्य लाभले.
चौकट:
“मी इयत्ता नववीत आहे. आजवर पत्रकारांच्या मुलांचा सत्कार कधीच झालेला नव्हता. प्रथमच माझा सत्कार व्हाईस ऑफ मीडियाने केल्यामुळे मला खूप आनंद झाला.”
— पयुष पंतगे (पाल्य)