धाराशिव शहरात नोकरीच्या आमिषाने 8 लाखांची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

धाराशिव – शहरातील एका नागरिकाला आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तब्बल 8 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दत्तात्रय संपत करवर (वय 38 वर्षे, रा. राघुचीवाडी, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 12 ऑक्टोबर 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एस.पी. ऑफिससमोरील प्रभात मल्टीस्टेट बँक, धाराशिव येथे आरोपी अंकुश देशमुख (रा. नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि संजय यमाजी साळवे (रा. मुंबई) यांनी आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादीने 8,10,000 रुपयांची रक्कम रोख व ऑनलाइन पद्धतीने आरोपींकडे दिली. मात्र, ठरल्याप्रमाणे कोणतीही नोकरी न लावता आरोपींनी पैसे घेऊन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम 406 (विश्वासघात), 420 (फसवणूक) आणि 34 (सहभाग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.