किरकोळ वादातून वृद्ध दाम्पत्यावर मारहाण; गुन्हा नोंदौ

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील चिंचपूर बु. येथे एका किरकोळ वादातून वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आंबी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभा सोमनाथ गायकवाड (वय 60 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 9 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पती सोमनाथ गायकवाड यांना संग्राम पांडू फाटे आणि गायकवाड (दोघे रा. चिंचपूर बु.) यांनी “पाठीमागे शिवीगाळ का करतोस?” या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व काठ्यांनी बेदम मारहाण केली. पतीला मारहाण होत असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी शोभा गायकवाड यांनाही आरोपींनी शिवीगाळ करत काठ्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकारामुळे गायकवाड कुटुंब भयभीत झाले असून त्यांनी दिनांक 17 जून 2025 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आंबी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.